(नक्की वाचा)
अभिजित
राजेंद्र साबळे (9503362676)
सध्या संपूर्ण देशभारत एकच चर्चेचा
विषय ठरलाय तो म्हणजे ‘गुजरात विधानसभा निवडणूक’ यंदा काँग्रेस आणि भाजपा
यांच्यातच खरी चुरशीची लढाई रंगणार आहे तर शिवसेना,राष्ट्रवादी,आणि इतर घटक
पक्षसुद्धा या रणधुमाळीत उडी घेणार आहेत.गुजरात मध्ये पाटीदार समाज /तेली
समाज/राजपूत समाज/गुजर समाज/दलित समाज
/मुस्लीम समाजाचे लोक प्रामुख्याने आहेत.
गेली २२ वर्षापासून भाजपाची गुजरात
मध्ये एकहाती सत्ता आहे.विद्यमान पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या तालिमीत
अनेक नेते गुजरात मधे उदयाला आले आणि सत्ता शाबूत ठेवण्यात हातखंडा मिळवला.गेली २२
वर्षापासून गुजरातेत भाजपा ची सत्ता असूनही मग २०१२ च्या विधानसभेनंतर अनेक विरोधक
भाजपाने कमवल्याचे चित्र सध्या गुजरात मधे असतानाच मोदींजी प्रधानमंत्री
झाल्यानंतर अनेक प्रश्न आणि सामाजिक समस्या तसेच भाजपा नेत्यांचा एकमेकांवरील
अविश्वास आणि त्यावरून पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारात बदल/पाटीदार समाजाचे
आरक्षणासाठीचे आंदोलन झाले. त्यातून नवीन युवा नेतृत्व भाजपाच्या विरोधात उदयाला
आले या सर्वांत गुजरातचा विकास कुठे गायब झाला हे समजलेच नाही.गुजरातच्या शहरी
भागात अर्थात अहमदाबाद,बडौदा,नवसारी,सुरत,गांधीनगर,सुरेन्द्रनगर,भावनगर,इत्यादी
ठिकाणी गुजरात सरकारने नक्कीच विकास केला मात्र ग्रामीण भागात शहरी भागाच्या
तुलनेत फक्त ४० ते ४५ % विकास झाल्याचे चित्र सध्या गुजरात मध्ये आहे.ग्रामीण
भागात शेतकऱ्यांच्या मालभावा च्या समस्या,तसेच अनेक ठिकाणी गुजरात सरकारने शासकीय
प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात लाटल्या तर अनेक ठिकाणी
रस्ते/आणि विजेची समस्या असल्याचे चित्र नुकतेच निवडणूक रणधुमाळीमुळे अनेक
वृत्तवाहिन्यांद्वारे स्पष्ट झाले आहे.आदरणीय मोदीजी लोकसभेच्या प्रत्येक लोकसभेत
आवर्जून सांगायचे की ‘भाईयो और बहनो हमारा गुजरात ईस देश के लिये विकास का मॉडेल
है’ हेच का मोदींचे विकासाचे मॉडेल असा हि प्रश्न उभा राहतो? गुजरातचा किती प्रदेश
विकसित झालाय आणि किती प्रदेश अजूनही अविकसित आहे हे राहुल गांधींनी जनतेसमोर
आणलेच असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातही होत असल्याचे जाणवते आहे.शहरात
रस्त्यांवर थरावर थर दिला जातोय पाहिजे तेवढ्या सोयी सुविधा घरातच काय तर अगदी
रस्त्यांवर सुद्धा ५ ते १० फुटावर विजेचे
बल्ब बसवले जातात मात्र ग्रामीण भागात पूर्ण रस्ते करणं तर सोडाच पण साधे खड्डे
सुद्धा बुजवले जात नाही आणि फुटावर वीज बल्ब बसवण तर काय इथे दूर दूरवर एखाद्या
गावात आणि तिथल्या घरात वीज असल्याचे चित्र अजूनही महाराष्ट्रात आहे हे
महाराष्ट्रच दुर्दैव आणि सत्तेत असलेल्या माजुऱ्या सरकारला सवाल केला तर जुन्या
सरकारवर खापर फोडतात अरे मग तुम्हाला कशाला निवडून दिल? असाच संताप गुजरातच्या
जनतेतून सुद्धा व्यक्त होतोय.
९ डिसेंबर ला गुजरातच्या निवडणुकीचा
पहिला टप्पा पार पडतो आहे या निवडणुकीत नेमकी कोणाची किती फजिती झाली आहे हे आपण
सर्वजण अनुभवतो आहे.
गुजरातची निवडणूक हि शक्यतो भावनिक
(हिंदुत्वाच्या) मुद्द्यावर होते असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.मात्र
यावेळी गुजरातची परिस्थिती काही वेगळीच दिसते आहे.गुजरात मधे प्रमुख शहरांमध्ये
व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग जास्त आहे.आदरणीय मोदिजी आणि भाजपाचे सर्वच नेते
सभांमध्ये फक्त कॉंग्रेस पक्ष आणि त्यातील नेते किती वाईट आणि देशाला किती घातक
आहे हे सांगत असतात मात्र विकासाच्या मुद्यावर काहीही बोलत नाही.ज्याप्रकारे
काँग्रेस पक्षाने विकासाच्या संदर्भात आपला जाहीरनामा जाहीर केला आहे अशा प्रकारचा
जाहीरनामा भाजपा चे अजूनही का जाहीर केला नाही कारण भाजपाला भीती आहे कि २२
वर्षापासून सत्ता आहे मग जाहीरनामा जाहीर केला तर विकसित कमी आणि अविकसित कामांचा
जाहीरनामा जास्त मोठा होईल.गुजरातचा व्यापारी वर्ग नोटबंदी मुळे तोट्यात गेला तो संताप संपतो नाही
तर पुन्हा GST यामुळे व्यापारी वर्ग आणि व्यावसायिक पूर्णपणे त्रासलेले
आहेत.त्यानंतर गुजरातचा प्रमुख प्रश्न म्हणजे युवकांना रोजगार मोदिजी सांगतात
कि गुजरात मध्ये आम्ही युवकांना रोजगार दिला गुजरात मध्ये अनेक युवकांना आम्ही
रोजगार उपलब्ध करुन दिला मग का बर? गुजरातचे अनेक युवक रोजगारासाठी महाराष्ट्रात
येतात आज जवळपास मुंबईत ३०% पुण्यात २०%नाशिक मध्ये ३०% गुजराती व्यापारी आणि
व्यावसायिक आहेत.मोदिजींच्या सांगण्यानुसार गुजरात मधे समृद्धी आहे तर गुजरातच्या
युवकांना रोजगारासाठी महाराष्ट्रच्या उंबरठ्यावर का याव लागत हा एक मोठा सवाल आहे.
भारतात सर्वात छोटे राज्य म्हणून गुजरात ओळखले जाते.पण याच राज्याच्या
विधानसभा निवडणुकीसाठी मा.पंतप्रधान यांच्या ५० सभांच आयोजन केले गेले आहे
त्यामुळे मोदिजी नेमके गुजरातचे मुख्यमंत्री आहेत कि देशाचे प्रधानमंत्री असा
प्रश्न उभा राहतो? लोकसभेसाठी मोदींच्या संपूर्ण गुजरात मध्ये फक्त ४ सभा झाल्या
होत्या विशेष म्हणजे ज्या गुजरात पॅटर्न वर संपूर्ण लोकसभा निवडणूक काबीज केली आता
त्याच गुजरात ला पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपाचे लोकसभा सदस्य.केंद्रीय
मंत्री,तसेच १४ राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे मातब्बर नेते गुजरात
मध्ये केवळ ३ युवकांना (राहुल गांधी,हार्दिक पटेल,जिग्नेश मेवानी) यांना टक्कर
देण्यासाठी जमवावे लागले आहे.या निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच भरमसाठ दारू
आणि पैसा वाटला जाईल आणि अनैतिक पद्धतीने सत्ता काबीज केली जाईल.जे सत्तेसाठी
इतक्या खालच्या थराला जातात त्यांना स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार नाही हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करुन भाजप
जनतेची फसवणूक करते आहे हे मात्र निश्चित.आणि यातच भाजपाचा आणि देशाच्या ज्येष्ठ
भाजपाच्या नेत्यांच्या नैतिक पराभव आहे.कदाचित भाजप गुजरातमध्ये बहुमताने येईल
सुद्धा मात्र नैतिक पराभव त्यांना स्वीकारावाच लागेल.एका तीळभर राज्यासाठी देशातले
भाजप नेते आणि खुद्द प्रधानमंत्र्यांनी तळ ठोकलाय ते हि ३ युवकांच्या विरोधात
यातूनच समजतय कि कोणाला जड जातय......
:-अभिजित
राजेंद्र साबळे (९५०३३६२६७६)
मु.पो.खेडलेझुंगे
ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५