Friday, 8 December 2017

गुजरातचा रणसंग्राम....


                    (नक्की वाचा)
 अभिजित राजेंद्र साबळे (9503362676)
सध्या संपूर्ण देशभारत एकच चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे ‘गुजरात विधानसभा निवडणूक’ यंदा काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच खरी चुरशीची लढाई रंगणार आहे तर शिवसेना,राष्ट्रवादी,आणि इतर घटक पक्षसुद्धा या रणधुमाळीत उडी घेणार आहेत.गुजरात मध्ये पाटीदार समाज /तेली समाज/राजपूत समाज/गुजर समाज/दलित समाज  /मुस्लीम समाजाचे लोक प्रामुख्याने आहेत.   
गेली २२ वर्षापासून भाजपाची गुजरात मध्ये एकहाती सत्ता आहे.विद्यमान पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या तालिमीत अनेक नेते गुजरात मधे उदयाला आले आणि सत्ता शाबूत ठेवण्यात हातखंडा मिळवला.गेली २२ वर्षापासून गुजरातेत भाजपा ची सत्ता असूनही मग २०१२ च्या विधानसभेनंतर अनेक विरोधक भाजपाने कमवल्याचे चित्र सध्या गुजरात मधे असतानाच मोदींजी प्रधानमंत्री झाल्यानंतर अनेक प्रश्न आणि सामाजिक समस्या तसेच भाजपा नेत्यांचा एकमेकांवरील अविश्वास आणि त्यावरून पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारात बदल/पाटीदार समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन झाले. त्यातून नवीन युवा नेतृत्व भाजपाच्या विरोधात उदयाला आले या सर्वांत गुजरातचा विकास कुठे गायब झाला हे समजलेच नाही.गुजरातच्या शहरी भागात अर्थात अहमदाबाद,बडौदा,नवसारी,सुरत,गांधीनगर,सुरेन्द्रनगर,भावनगर,इत्यादी ठिकाणी गुजरात सरकारने नक्कीच विकास केला मात्र ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत फक्त ४० ते ४५ % विकास झाल्याचे चित्र सध्या गुजरात मध्ये आहे.ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालभावा च्या समस्या,तसेच अनेक ठिकाणी गुजरात सरकारने शासकीय प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात लाटल्या तर अनेक ठिकाणी रस्ते/आणि विजेची समस्या असल्याचे चित्र नुकतेच निवडणूक रणधुमाळीमुळे अनेक वृत्तवाहिन्यांद्वारे स्पष्ट झाले आहे.आदरणीय मोदीजी लोकसभेच्या प्रत्येक लोकसभेत आवर्जून सांगायचे की ‘भाईयो और बहनो हमारा गुजरात ईस देश के लिये विकास का मॉडेल है’ हेच का मोदींचे विकासाचे मॉडेल असा हि प्रश्न उभा राहतो? गुजरातचा किती प्रदेश विकसित झालाय आणि किती प्रदेश अजूनही अविकसित आहे हे राहुल गांधींनी जनतेसमोर आणलेच असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातही होत असल्याचे जाणवते आहे.शहरात रस्त्यांवर थरावर थर दिला जातोय पाहिजे तेवढ्या सोयी सुविधा घरातच काय तर अगदी रस्त्यांवर सुद्धा ५ ते १० फुटावर  विजेचे बल्ब बसवले जातात मात्र ग्रामीण भागात पूर्ण रस्ते करणं तर सोडाच पण साधे खड्डे सुद्धा बुजवले जात नाही आणि फुटावर वीज बल्ब बसवण तर काय इथे दूर दूरवर एखाद्या गावात आणि तिथल्या घरात वीज असल्याचे चित्र अजूनही महाराष्ट्रात आहे हे महाराष्ट्रच दुर्दैव आणि सत्तेत असलेल्या माजुऱ्या सरकारला सवाल केला तर जुन्या सरकारवर खापर फोडतात अरे मग तुम्हाला कशाला निवडून दिल? असाच संताप गुजरातच्या जनतेतून सुद्धा व्यक्त होतोय.
९ डिसेंबर ला गुजरातच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडतो आहे या निवडणुकीत नेमकी कोणाची किती फजिती झाली आहे हे आपण सर्वजण अनुभवतो आहे.
गुजरातची निवडणूक हि शक्यतो भावनिक (हिंदुत्वाच्या) मुद्द्यावर होते असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.मात्र यावेळी गुजरातची परिस्थिती काही वेगळीच दिसते आहे.गुजरात मधे प्रमुख शहरांमध्ये व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग जास्त आहे.आदरणीय मोदिजी आणि भाजपाचे सर्वच नेते सभांमध्ये फक्त कॉंग्रेस पक्ष आणि त्यातील नेते किती वाईट आणि देशाला किती घातक आहे हे सांगत असतात मात्र विकासाच्या मुद्यावर काहीही बोलत नाही.ज्याप्रकारे काँग्रेस पक्षाने विकासाच्या संदर्भात आपला जाहीरनामा जाहीर केला आहे अशा प्रकारचा जाहीरनामा भाजपा चे अजूनही का जाहीर केला नाही कारण भाजपाला भीती आहे कि २२ वर्षापासून सत्ता आहे मग जाहीरनामा जाहीर केला तर विकसित कमी आणि अविकसित कामांचा जाहीरनामा जास्त मोठा होईल.गुजरातचा व्यापारी वर्ग  नोटबंदी मुळे तोट्यात गेला तो संताप संपतो नाही तर पुन्हा GST यामुळे व्यापारी वर्ग आणि व्यावसायिक पूर्णपणे त्रासलेले आहेत.त्यानंतर गुजरातचा प्रमुख प्रश्न म्हणजे युवकांना रोजगार मोदिजी सांगतात कि गुजरात मध्ये आम्ही युवकांना रोजगार दिला गुजरात मध्ये अनेक युवकांना आम्ही रोजगार उपलब्ध करुन दिला मग का बर? गुजरातचे अनेक युवक रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात आज जवळपास मुंबईत ३०% पुण्यात २०%नाशिक मध्ये ३०% गुजराती व्यापारी आणि व्यावसायिक आहेत.मोदिजींच्या सांगण्यानुसार गुजरात मधे समृद्धी आहे तर गुजरातच्या युवकांना रोजगारासाठी महाराष्ट्रच्या उंबरठ्यावर का याव लागत हा एक मोठा सवाल आहे. भारतात सर्वात छोटे राज्य म्हणून गुजरात ओळखले जाते.पण याच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मा.पंतप्रधान यांच्या ५० सभांच आयोजन केले गेले आहे त्यामुळे मोदिजी नेमके गुजरातचे मुख्यमंत्री आहेत कि देशाचे प्रधानमंत्री असा प्रश्न उभा राहतो? लोकसभेसाठी मोदींच्या संपूर्ण गुजरात मध्ये फक्त ४ सभा झाल्या होत्या विशेष म्हणजे ज्या गुजरात पॅटर्न वर संपूर्ण लोकसभा निवडणूक काबीज केली आता त्याच गुजरात ला पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपाचे लोकसभा सदस्य.केंद्रीय मंत्री,तसेच १४ राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे मातब्बर नेते गुजरात मध्ये केवळ ३ युवकांना (राहुल गांधी,हार्दिक पटेल,जिग्नेश मेवानी) यांना टक्कर देण्यासाठी जमवावे लागले आहे.या निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच भरमसाठ दारू आणि पैसा वाटला जाईल आणि अनैतिक पद्धतीने सत्ता काबीज केली जाईल.जे सत्तेसाठी इतक्या खालच्या थराला जातात त्यांना स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार नाही  हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करुन भाजप जनतेची फसवणूक करते आहे हे मात्र निश्चित.आणि यातच भाजपाचा आणि देशाच्या ज्येष्ठ भाजपाच्या नेत्यांच्या नैतिक पराभव आहे.कदाचित भाजप गुजरातमध्ये बहुमताने येईल सुद्धा मात्र नैतिक पराभव त्यांना स्वीकारावाच लागेल.एका तीळभर राज्यासाठी देशातले भाजप नेते आणि खुद्द प्रधानमंत्र्यांनी तळ ठोकलाय ते हि ३ युवकांच्या विरोधात यातूनच समजतय कि कोणाला जड जातय......
:-अभिजित राजेंद्र साबळे (९५०३३६२६७६)
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५



Wednesday, 26 July 2017

जीवनाचे ध्येय....


:-अभिजीत रा.साबळे (खेडलेझुंगे)
abhisabale09@gmail.com

एवढ्याश्या आयुष्यात खूप काही हवं असतं
खूप काही हवं असतं पण पाहिजे ते मिळत नसतं
पाहिजे ते मिळालं तरी त्यातही काही कमीच असतं
चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ रितचं असतं...
असे जरी असले तरी,
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन अशा किनारा तुला पामराला |
अशी इच्छाशक्ती दुर्दम्य ध्येयवाद हे मानवी जीवनाला मिळालेले वरदानच आहे.ध्येयवादी मानवी जीवनाला बंधन येते.बंधनाशिवाय विकास होत नाही व संयमाशिवाय सिद्धी नाही.म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय हवे.ज्याच्या जोरावर उदार होवून लढू असे काहीतरी निशाण हवे.
आपण जर एखाद्याला विचारले तर तो सांगतो मला डॉक्टर,वकील,इंजिनियर,शिक्षक व्हायचय!पण हे ध्येय जीवनातील विशिष्ट वयापर्यंतच सिमित असते.त्यातही स्वार्थच दडलेला असतो.इच्छा वा ध्येय पूर्ण झाल्यावर पैशाच्या जोरावर राजा कदाचित ययाती सुद्धा होवू शकतो.कारण ध्येय हे फक्त जीवन निर्वाहासाठी व उपभोगासाठीच असते.I can earn my bread असे झाले म्हणजे जीवनातील ध्येय पूर्णहोत नाही.कारण ‘आहार निद्राभय मैथुनं च’ ह्या गोष्टी पशु पक्षी सुधा करतात.मग त्यांच्यात व आपल्यात फरक तो काय? तर आपल्याला धर्म (मानवता) असतो हाच मोठा फरक असतो.
कमळाच्या पानांवरीलपाण्याचा थेंब ज्याप्रमाणे केव्हाही घरंगळून नष्ट होण्याची शक्यता असते.त्याचप्रमाणे मानवी जीवन देखील केव्हा नष्ट होईल हे सांगताच येत नाही.म्हणूनच जीवनाचे सार जे आपणास आवडते ते करण्यात नाही तर जे आपण करतो ते आवडण्यात आहे.व्यक्तिमत्वाचा विकास,चारित्र्याची घडण,स्वसंस्कृतीची ओळख ह्या जीवनविकासाकडे नेणाऱ्या गोष्टीच जीवनातील ध्येय बनू शकतात म्हणजे What is life?How to live life? हे पूर्णतः समजून घेवून तसे गुणवान शक्तिशाली व्यक्तिमत्व बनवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.
जीवन जर कर्तव्य असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे Men are not born they are made माणुसकी,माणसाचे प्रेम हे एखाद्या धरतीसारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.तेव्हाच धरती दाण्यांनी टिच्चून भरलेलं कणीस देते.माणूसही तसाच असतो.एक प्रेमाचा शब्द कोणी दिला तर त्याच्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो.म्हणून प्रथम स्वतः माणुसकी दाखवली पाहिजे,स्वतः झुकले पाहिजे
‘माणूस म्हणजे पशु नसे,हे ज्याच्या हृदयावर ठसे,
नर नारायण तोची असे’
मी माणूस आहे ह्याची जाणीव जेव्हा होईल तेव्हा आत्मगौरव वाढेल,अन जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्यामुळे परसन्मान वाढेल,माणूस जन्माला येताच असंख्य अतूट नात्यांनी बांधला गेलेला असतो.जीवनाच्या या वाटचालीत जुने धागे तुटतात व नवे निर्माण होतात.पण ह्या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफतच रहावा लागतो.ह्या गुंफण कलेतील धाग्यांची जपवणूक करण्यातच खरी माणुसकी आहे.माणसाशी असलेले माणसाचे नाते समजून घेणे हीच जीवन जगण्याची खरी कला आहे.मी मोठं होवून माझं करियर करेन.चांगल्या हुद्यावर नोकरी करेन असे ध्येय असेल तर ते वयाच्या ३० वर्षापर्यंतच सिमित राहते.पण नंतर मात्र आपण काहीच केले नाही याची जाणीव होते
म्हणूनच ध्येय हे उच्च असले पाहिजे आकाशाला भिडणारे पण पाय मात्र स्थिर जमिनीवर टेकलेले असावेत.ज्याप्रमाणे शेतकरी आकाशाकडे नजर लावून बघत राहतो पण त्याचे पाय मात्र जीवन व्यवहारात पक्के रोवलेले असतात असे ध्येय हवे ज्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी तर मन विकसित करण्यासाठी प्रेम,भाव ,आपुलकी,आत्मीयता यांची नितांत गरज असते.कारण मनुष्य कोट्यावधी मैल दूर असणारे तारे दुर्बीणीने पाहू शकतो पण स्वतःच्या टीचभर हृदयाचा तळ त्याला शोधून काढता येत नाही.परंतु कुणी देव म्हणो! कुणी दैव म्हणो!कुणी निसर्ग म्हणो!कुणी योगायोग म्हणो!पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही अशी अंध,अवखळ,शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते.
कधी रक्ताच्या नात्याने,कधी गरजेच्या नात्याने,कधी मैत्रीच्या तर कधी प्रेमाच्या नात्याने.......वादळी समुद्रात फळकटाच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे एकत्र येतात तसेच या अफाट जगात घडते.जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे.दुसऱ्या माणसाशी जडलेले नाते नं विसरणे त्याचे जीवन फुलावे म्हणून जे जे करता येईल ते ते करणे.....
म्हणूनच मला सुद्धाजीवनात स्वार्थी ध्येय ठेवायचे नाही.कारण भंग स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून मला जीवन व्यतीत करायचे नाही.
केव्हा होईल जीवन माझे निर्मळ वाऱ्यापरी
हूर हूर दाटली हीच एक अंतरी
:-अभिजीत राजेंद्र साबळे
                                      

Tuesday, 7 February 2017

आर्की.अमृता पवार एक चाणाक्ष समाज संघटक



सध्या संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूकींची रणधुमाळी सुरु झाली आहे.या जिल्हा परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीत जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात देखील यंदा चांगलीच चुरस पहायला मिळणार असून संपूर्ण नाशिक जिल्ह्याच लक्ष या देवगाव गटाकडे वेधलं गेलं आहे.त्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिक जिल्ह्याचे शिक्षणसम्राट डॉ.वसंतराव पवार यांच्या कन्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध आर्किटेक्ट अमृता वसंतराव पवार या देवगाव गटातून राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार आहेत.अनेक वर्षापासून या देवगाव गटात विकास कामांबाबत जनतेमधून नाराजीचा सूर उमटत होता.मात्र आर्की.अमृता पवार यांनी या देवगाव गटातून फॉर्म भरल्या नंतर जनतेतून सकारात्मक भाव/प्रतिसाद पहायला मिळतोय.देवगाव गटातून अजून एक विशेष म्हणजे पहिल्यांदा एक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी इथे मिळणार आहे.
आर्की.अमृता वसंतराव पवार यांचा थोडक्यात परिचय.
अमृता पवार या सध्या उत्तर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी महिला संघटक असून गोदावरी अर्बन को.ऑप.बँकेच्या-चेअरमन,तसेच नाशिक च्या विकासात एक आर्किटेक्ट म्हणून त्यांचा मोलाचा वाटा आहे.

अमृता पवार यांच १ ते १० च शिक्षण निर्मला कोन्व्हेंट,नाशिक येथे तर ११ वी ते १२ वी च शिक्षण के.टी.एच.एम.महाविद्यालयात विज्ञान शाखेतून घेतलं.त्यानंतर मविप्र आर्किटेक्चर कॉलेज ला आर्किटेक्ट च संपूर्ण शिक्षण घेऊन (Master in Landscape Arch.) हि पदवी प्राप्त करून २ वर्ष अहमदाबाद(गुजरात) मध्ये M.L.S.A.चा अभ्यास पूर्ण केला.त्यानंतर त्यांना थेट ऑस्ट्रेलिया वरून खास बोलावणे आले. आणि सलग ४ वर्ष ऑस्ट्रेलियातील(सिडनी) या शहरात त्यांनी आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस केली.त्याचप्रमाणे न्यूयॉर्क,लंडन,मुंबई,दुबई, इत्यादी ठिकाणी देखील त्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम केले आहे.अमृताताई यांनी भारतातील अनेक नामंकित आर्किटेक्चर महाविद्यालयांमध्ये सेमिनार घेऊन आर्किटेक्चर क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना धडे दिले.जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई,जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स दिल्ली,आणि मविप्र आर्किटेक्चर महाविद्यालय,नाशिक इत्यादी नामांकित महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले असून अजूनही त्या सदर महाविद्यालयांमध्ये शिकवण्याच काम करतात.
खरं तर देवगाव गटाला पहिल्यांदाच इतका उच्चशिक्षित उमेदवार मिळाल्याने जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात असून जनतेला अमृता पवार यांच्या माध्यमातून नक्कीच विकास होईल अशी खात्री वाटू लागली आहे.