abhisabale09@gmail.com
संगीत म्हणजे मनाला अगदी चिरतरुण करणारी देवाने मानवाला दिलेली एक देणगी आहे अस जरी म्हंटल तरी वावगं ठरणार नाही कारण दरवर्षी हिच चितरुण संगीत संजीवनी आपल्या सारख्या रसिकांसाठी आयोजीत करण ही देखील तितकीच् महत्वाची गोष्ट आहे आणि हेच सत्कार्य पुण्याचे सुरश्री फाऊंडेशन करतय २०११ सालापासून “स्वरभास्कर संगीत महोत्सव” कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी सुरु करण्यात आला सालाबादाप्रमाणे या वर्षीही २३ डिसेंबर २०१६ ते २५ डिसेंबर २०१६ दरम्यान “स्वरभास्कर संगीत महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन मा.श्री. प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच शां. व. मुजुमदार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मा. श्री.शशिकांत सुतार, डॉ.अमोल कोल्हे , मा.श्री.विनायक निम्हण आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तित राहणार आहे. या कार्यक्रमात गायीका " सौ.रेवा नातू " यांना ‘स्वरभास्कर’ पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. या महोत्सवात श्री.स्वीकार कट्टी ,श्री. अभिषेक बोरकर ,पं.रामदास पळसुले, पं. शीधर पार्थसारथी , सौ. अपर्णा केळकर, उस्ताद.शाहिद परवेज, श्री.अनुज मिश्रा आदी कलाकारही सहभागी होणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला करण्यात आला आहे. या सुवर्ण संधीचा फायदा तमाम रसिकप्रेमींनी घ्यावा, असे आव्हान गायत्री वैरागकर-जोशी यांनी केले आहे.
गायत्री वैरागकर-जोशी ह्या एका संगीत कलाकार कुटुंबातील आहेत. भेंडी बाजार घराण्याचे कुशल गायक नाशिक मधील सुप्रसिद्ध संगीतकार "श्री.शंकरराव वैरागकर" यांची कन्या. “श्री. पं.शंकरराव वैरागकर” यांची कन्या.. पं.शंकरराव वैरागकर यांनी आपल्या घरातूनच सौ. विजयालक्ष्मी वैरागकर-मणेरीकर, गायत्री वैरागकर-जोशी, श्री. ओंकार वैरागकर यांच्याच पाठोपाठ कु. रागेश्री वैरागकर नव्या पिढीतील एक नामवंत कलाकारांपैकी एक. असे उत्कृष्ट कलाकार महाराष्ट्राच्या संगीत खजिन्याला प्राप्त करून दिले. यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच " वैरागकर" घराण्याचे नाव संगीतात्मक घराण्याशी जोडले. गायत्रीताईंनी वडिलांच्या सखोल मार्गदर्शनाने लहान वयात संगीतकला आत्मसात केली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून 'संगीत अलंकार " तसेच पुणे विद्यापीठाच्या M.A. (संगीत) पदवी प्राप्त करून आग्रा-जयपूर "सौ.आरती अंकलीकर-टिकेकर" यांच्या कडून संगीताचे प्रगत प्रशिक्षण प्राप्त केले व सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवले .त्यांचा आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही . गायत्री वैराग्यकार-जोशी यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या दादरा, ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करतात. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे गायत्रीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटिल)
मु.पो-खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक
abhisabale09@gmail.com