:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या पुढाकाराने ‘रॉकिंग बॅण्ड’-एक अनोखी संगीत स्पर्धा
येत्या २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. ‘रॉकिंग बॅण्ड’गीत लिहा, संगीतबद्ध करून सादर करा
केवळ ६० मिनिटात , हि एक अनोखी स्पर्धा छोट्या शालेय कलाकारांसाठी आहे .. ह्या
स्पर्धेचे वैशिष्ठ्यम्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा नाशिकमध्ये
आयोजित होत आहे. विध्यार्थी फक्त अभ्यासातील पुस्तकी किडे
बनलेले आहेत असं मत आधी होते,आतापर्यंत लिखित
स्वरूपातील ज्ञानच मुलांना मिळत होते पण आजच्या युगात मुलांचे करिअर
निवडण्यासाठी देखील त्यांचा सुप्तगुणांचा वापर शाळेपासून कसा होतो हे या
स्पर्धेमधून दाखवले जाईल.
हि एक ग्रुप ऍक्टिव्हिटी असल्यामुळे
सर्वाना सोबत घेऊन कसे काम करावे व त्यात यश संपादन करावे
हे या स्पर्धेतुन शिकतायेण्यासारखे आहे. गाणे लिहायची आवड असेल ,संगीतकार, संगीत संयोजक बनण्याची
संधी यातून प्राप्त होईल.
या
स्पर्धेत साधारणपणे ५ ते ७ विद्यार्थ्यांच्या संघाने केवळ ६० मिनिटांमध्ये
आयत्यावेळी सोडतीद्वारे मिळालेल्या विषयावर गीत लिहिणे ,गीतासाठी संगीत रचना करणे
आणि सराव करून सवाद्य लयबद्ध गीत सादर करणे असे या स्पर्धेचे स्वरूप आहे.
सदर
स्पर्धा दोन गटात होत असून पहिल्या ‘अ’ गटात इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात तर
दुसऱ्या ‘ब’ गटात इयत्ता ८ वी ते १० वी चे विद्यार्थी आपले कसब दाखवू शकतात, संगीत व गायन क्षेत्रात
उगवत्या बाल कलाकारांना त्यांच्यातील कलागुण सादर करण्यासाठी हि स्पर्धा म्हणजे
अनोखे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी हि संधी न दवडता नावनोंदणीसाठी principal.gvis@gmail.com ह्या इमेल आयडी वर अर्ज भरून पाठवावेत.
विजेत्यांना प्रमाणपत्रासह मानचिन्ह,आकर्षक भेटवस्तू आणि रोख
बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे,तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाणार आहे.
या व्यतिरिक्त विविध वैयक्तिक प्रकारात हि विशेष बक्षिसे असणार आहेत. विद्यार्थी व
शाळांनी अधिक माहितीसाठी ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनलस्कूल मध्ये संपर्क साधावा.
ग्लोबल
व्हिजन इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका सौ . विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी
नासिकच्या सर्व संगीत प्रेमींना या स्पर्धे साठी लवकरात लवकर नाव नोंदवण्याचे
आवाहन केले आहे.तसेच या स्पर्धेमध्ये खाजगी संगीत विद्यालय आपला सहभाग नोंदवू
शकतात.
संगीत
स्पर्धा संकल्पना :-
सहभागी
विद्यार्थ्यांची भूमिका :-
* प्रत्येक गटातील फक्त २-३ विद्यार्थी वाद्य वाजवतील.
1) गीतकार
2) संगीतकार
3) संगीत संयोजक
4) वादक
5) गायक
* नोंदणी :-
2)
प्रत्येक गटासाठी प्रवेश फी
१०००/- अनिवार्य
3) नाव नोंदणी दिनांक 15 / 12 / 2016 पूर्वी करावी.
4) शाळेची नोंदणी हि प्रवेश फी भरल्यानंतरच ग्राह्य धरली जाईल .
5) नाव नोंदणी नंतर अर्ज रद्द केला जाणार नाही.
6) कोणत्याही कारणास्तव प्रवेश फि परत केली जाणार नाही.
* बक्षिसे :-
1) प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि एक भेटवस्तू दिली जाईल.
2) विजेत्या गटाला मानचिन्ह, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षीस दिले जाईल.
* विशेष बक्षिसे :-
1) सर्वोत्तम गायक
2) सर्वोत्तम गीत
3) सर्वोत्तम संगीत
दिग्दर्शक.
4) सर्वोत्तम गट
5) सर्वोत्तम नाविन्यपूर्ण संकल्पना
अटी व शर्ती :-
1) हि एक ग्रुप अक्टिव्हिटी आहे त्यामुळे गीत सादरीकरणासाठी एक गट
फक्त एकाच भाषेचा वापर करू शकतो.
2) प्रत्येक गट 08:30 वाजता GVIS मध्ये अहवाल देतील.
3) प्रत्येक शाळेतील कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 गट एका संघासाठी सहभागी
होऊ शकतात.
4) शाळेचा मुख्य विद्यार्थी प्रत्येक गटातील इतर विद्यार्थ्यांची
भूमिका ठरवू शकतो.
5) प्रत्येक गटाला सोडत प्रणाली द्वारे सादरीकरणासाठी एका विषय दिला
जाईल. जो तुम्ही हिंदी, इंग्रजी व मराठी यापैकी कोणत्याही एक भाषेत सादर करू शकता
6) प्रत्येक गटाला रचना, संगीत दिग्दर्शन, संगीत व्यवस्था, वाद्य सराव आणि अंतिम सराव यासर्वांसाठी एकत्र 60 मिनिटे मिळतील.
7) प्रत्येक गटाला सादरीकरण आणि व्यवस्थेसाठी 5 मिनीटे मिळतील
8) प्रत्येक गट स्वतःची वाद्य घेऊन येईल. (उदाहरणार्थ कीबोर्ड, हार्मोनियम, ढोल, ताशे, खंजेरी, तबला, गिटार इ. किंवा तुम्ही या
उल्लेख वाद्यांपेक्षा इतर कोणत्याही सर्जनशील वाद्यांचा उपयोग शकता.)
9) प्रत्येक गटाला लिखाणासाठी लागणारे कागद व लेखणी शाळेच्या केंद्रात
प्राप्त होईल.
10) कोणताही गट स्पर्धे दरम्यान कुठल्याच शिक्षकांची मदत घेऊ शकणार
नाही.
11) प्रत्येक गटातील सदस्य गीत सादरीकरणामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
12) स्पर्धे दरम्यान मोबाइल, टॅब, आय-फोन अशा
प्रकारची कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
13) संघाच्या निर्णयाप्रमाणे वेशभूषा करू शकता. फक्त शाळेचे
ओळखपत्र आवश्यक आहे .
14) विद्यार्थी सकाळ पासून संध्याकाळपर्यत स्पर्धेत असल्यामुळे त्यांचा
दोन वेळचा पुरेसा जेवणाचा डबा आणि पाण्याची बॉटल सोबत असावी.
15) शाळेने स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांना घेऊन यावे व घेऊन
जावे.
16) तयार होणारे गाणे 3 मिनिटांपेक्षा जास्त नसावी.
17) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारच्या वादाची दखल
घेतली जाणार नाही.
* अधिक माहिती साठी :-
कार्यालय :-
0253-2382900
मोबाइल :-
7770077014
:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५