Sunday, 20 November 2016

"संगीतरत्न" पं.शंकरराव वैरागकर.....

अभिजीत रा.साबळे(पाटील)
abhisabale09@gmail.com



ठेविले अनंत तैसेची रहावे | चित्ती असू द्यावे समाधान
या संत तुकारामांच्या अभंगाचा बोध घेऊन माझेच नव्हे तर आम्हा सर्व शिष्यांचे गुरुदेवच नव्हे तर सद्गुरुदेव अर्थात “संगीतरत्न” पं.शंकरराव वैरागकर सर.सारा महाराष्ट्र त्यांना आप्पा या नावाने ओळखतो,अहोरात्र चंदनाप्रमाणे सुगंध देणारं हे चंदनाचं परोपकारी झाड गेली ४५ वर्ष सतत संपूर्ण महाराष्ट्राला अविरतपणे शास्रीय संगीताच्या माध्यमातून वारकरी भजनाचा सुगंध देत आहे.अवघ्या महाराष्ट्रात जिथे टाळवाजतो तिथे आप्पांच नाव माहित नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.पायाला चक्र बांधल्या प्रमाणे आप्पा दिवस रात्र अजूनही शास्रीय गायन व भजनाचे कार्यक्रम करत असतात.एक व्यवसाय म्हणून नाही तर केवळ संगीत कलेचा प्रचार व प्रसार आणि समाजसेवा या जाणीवेने त्यांच्या आयुष्यातला एकन एक क्षण व्यापलेला आहे. या वेगळ्या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा १९८० साली क.का.वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर येथे संगीत शिक्षक म्हणून त्यांचा नाशिक जिल्ह्यात प्रवेश झाला.लहान मुलांचा वाद्यवृंद घडवता-घडवता आजूबाजूच्या शेकडो खेड्यातील गरीब विद्यार्थ्यांनाही घडवण्याचे कार्य आप्पांनी कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता निस्वार्थीपणे केले.आता पर्यंत आप्पांचे ३७० पेक्षा अधिक विद्यार्थी संगीत विशारद व संगीत अलंकार हि पदवी प्राप्त करून समाजात संगीत कलेचा प्रचार व प्रसार करत आहे.शिकवण्याचं काम तर सर्वच करतात पण फक्त शिकवूनच विद्यार्थी घडत नसतो तर विद्यार्थ्यांनीही शिकवलेलं ग्रहण करून सतत रियाज केला पाहिजे असे ते नेहमी म्हणतात,आप्पांच्या ह्रद्याची विशालताच निराळी आहे.अति सामान्य विद्यार्थ्याला घडवताना त्याची जात-पात परिस्थिती असा कोणताही भेदभाव न करता “हं चल बसं अन घोक सारेगम” हाच त्यांचा पेशा आहे. दगडासारखे विद्यार्थीही ठोकून त्यांच्यातून मूर्ती तयार केलेली अनेक उदाहरणे आहेत.आप्पा हे केवळ एक कलाकारच नव्हे तर,एक विशाल हृद्याचे संत,कोमल हृदयाचे कलावंत,आणि चाणाक्ष असे गुरु आहेत,कलेच्या साधनेप्रती जरी ते कठोर असले तरी मानाने ते फार दयाळू व श्रीमंत आहे,म्हणूनच मला अस म्हणावसं वाटत की,
तू माऊलीहूनी मवाळ | चंदनाहुनी शितळ
पाण्याहुनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा
अध्यात्म,परमार्थ,आणि कला यांचा त्रिवेणी संगम म्हणजे माझी गुरुमाऊली आप्पा होय.आप्पांसोबत मी ही अनेक कार्यक्रमाला महाराष्ट्रभर फिरलो,लागोपाठ आठ ते दहा दिवस सकाळ संध्याकाळ असे बरेच कार्यक्रम मी पाहिलेत,प्रवास जमेल तसा.बस,रेल्वे,कधी-कधी ट्रकने सुद्धा केलाय,कार्यक्रम स्थळापर्यंत पाहोचण हीच त्यांची तळमळ असत आणि सर्व श्रोते आणि साथीदारांच्या आधी व्यासपीठावर हजर होत मानपानं,बडेजावपणा यापासून कित्येक मैल पुढे गेलेला असा महाकलाकार माणूस मी माझ्या आयुष्यात आजवर कधीच बघितला नाही.आप्पांना संत हि उपाधी अगदीच शोभून दिसते.कार्यक्रम करून येताना सत्कारात शाल असो,कापड असो,किंवा अन्य काही भेटवस्तू असो येतायेताच बसस्थानक किंवा रेल्वेस्थानकावरील गरिबांना वाटताना मी अनेकदा पहिली,कोणत्याही दुसऱ्यासाठी केलेल्या गोष्टीची आठवण ठेवणं हे त्यांना आवडत नाही.दुसऱ्याला जेवढ शक्य होईल तेवढं देत जाणे व दिलेलं विसरत जाणे हि आप्पांची एक मनोबलता आहे.त्यांना मिळालेल्या अनेक भेटवस्तू ते विद्यार्थ्यांमध्ये वाटून देत.अनेक गरीब विद्यार्थ्यांची शालेय फी आप्पांना भरताना मी सुद्धा पाहिलंय आणि हा त्यांच्या जीवनाचा एक विशेष पैलू आहे.संगीत साधनेत ख्यालापासून तर लावणी पर्यंतचा त्यांचा सखोल अभ्यास असून संगीत क्षेत्रातील एक गाढे अभ्यासक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.आप्पांसमोर कुठल्याही प्रकारचं गाणं ठेवलं कि एका क्षणात त्याची चाल तयार करून लगेच सादर करत,शब्द काव्य वाचताना चाल तयार करून लगेच काही सेकंदात सादर करणं इतकी भारदस्त शैली मी आजवर आप्पांपेक्षा इतर कुणातच नाही बघितली याच तत्वावर आधारित आप्पांचे अनेक अल्बम झाले आहेत.आप्पा म्हणजे पहाटे ५ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सतत तानपुऱ्यात गुंजत राहणारा एक स्वतंत्र वेदच आहे.
आप्पांच्या एकंदरीत जीवनाकडे पाहतांना बालपणापासून ते वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंतच्या ज्या हाल अपेष्टा,मानापमानाचे हाल,सहन केलेत आणि संगीत कला शिकण्यासाठी संगीताची साधना करताना त्यांनी उलट्या प्रवाहात पोहता-पोहता जे भोगलं,ते सर्व काही एकलं कि माझ्या अंगावर कटाच उभा राहतो जीवनात दिवस अन रात्र येतातच तसेच कष्टाने सर्व काही सध्या होते हि त्यांची मोलाची शिकवण आहे.अहोरात्र शिकवणे.शाळा,कार्यक्रम,संसार,प्रवास,समाज बांधिलकी,हे सर्व तंत्र या माणसानं कसे साधले हे समजण्यापलीकडेच आहे.शिष्य घडवताना पैसे टाकून आठवड्याचे दिवस मोजणाऱ्याना आप्पांनी कधी थारा दिला नाही,निम्मित करून आळस करणाऱ्यांचा त्यांना फार राग आहे.आप्पा हे जनसामान्यांचे गुरु आहेत.रात्री २ वाजता जरी फोन आला तरी त्यांच्या शंकेच निरसन करण्यात त्यांना आनंद  वाटतो.
आप्पांची अनेक रूपं मी पाहिलेली आहेत सतत एखादी रागदारी बंदिश अथवा एखाद्या अवघड चालीची निर्मिती यातच आप्पा यातच आप्पा नेहमी दंग झालेले असतात.आप्पांना कुणाचा मत्सर कशाचा लोभ,हव्यास,मोह नाही कलेचं वेड तोच विचार तोच आचार आणि तो म्हणजे संगीत साऱ्या जगाला प्रत्येक मैफलीत सुखी व आनंदी माणसाचा सादरा हवा असेल तर माझा घेवून जा असं रोख ठोक सांगणारा माणूस आजच्या जगात विरळच त्याचं वागणं बोलणं हे देव न्हात्या पाण्यासारखं निर्मळ आहे.त्यांच्या वागण्याला व बोलण्याला कुठल्याही प्रकारची इस्री नाही.म्हणून सतत आनंदी चेहरा असतो मी त्यांना कधीच दुर्मुखलेल पहिलच नाही.
ख्यालाच्या बंदिशीच सौंदर्य किंवा ठुमरीची नजाकत अथवा लावणीची अदाकारी असो या सर्वांचा आत्मा म्हणजे गाण्याचा भाव.ह्या एकच गळ्यातून सर्व संगीताचे प्रकार तितक्याच समर्थपणे मांडणारे आप्पा नाट्यगीताच्या एकन एक ओळीचे शेकडो अविष्कार तर भावगीतातला भाव हि त्यांच्याच आवाजातून ऐकावा.गाणं हे पोट भरण्याचंसाधन न ठेवता आनंद निर्मिती हे ध्येय ठेवल तरच कलाकाराला त्यातला आत्मा सापडेल हे त्यांचं सांगण असत शिकवण्याचा त्यांचा एक विशेष पैलू म्हणजे ते एक तर शिकवण्याचे पैसे घेत नसत,पण जरी कुणी दक्षिणा दिली तर ते समाज कार्यासाठी त्या दक्षिणेचा उपयोग करत.आप्पा नेहमी म्हणत गुरु हा घेणारा नव्हे देणारा असावा वर्ष भर जमेल ती दक्षिणा गुरुवंदना किंवा हरीनाम साप्ताहाला अन्नदान म्हणूनच त्यांनी दिलेली आहे.अवघड ते सोपे करून शिकण्याची दैवजात देणगी आप्पांना लाभलेली आहे.आप्पा म्हणजे एक उत्तम शीघ्रकवी आहे.संतूर,सरोद,सतार,तबला,बासरी,सारंगी,जलतरंग इत्यादी वाद्य ही आप्पा उत्तमरीत्या वाजवतात,पण या सगळ्या संगीत प्रकारातून आप्पा मनोभावे रमले ते भजनात भजन हा त्यांचा जीव कि प्राण आहे.खेड्यापाड्यात शास्रीय संगीत पोहोचवण्याची चालती बोलती जंत्री म्हणजे माझे गुरुदेव आप्पा होय.त्यांच्या भजनात सर्व रसिक जणू पांडुरंग होऊनच डोलतात.प्रत्येक गायक म्हणजे पंचपक्कवनांच एक स्वतंत्र ताट असत असं त्याचं प्रामाणिक मतं आहे.
                                  आप्पांना स्वरांप्रमाणेच माणूसकितील जीवंतपणा हि खूप प्रिय आहे.उभ्या महाराष्ट्रात लाखो माणसं आप्पांना जोडलेली आहे.व्यासपीठावरून उतरून गाडीत बसायला तासन-तास वेळ रसिकांच्या घोळक्यात अडकल्यामुळे झालेला मी अनुभवला आहे पुढाऱ्यांपासूनतर सामान्य माणसांपर्यंत सर्वांसोबत प्रेमाने बोलणारे व सारख्याच मनानं बोलणाऱ्या या गुरुमाऊलीचे कौतुक करायला शब्दच पुरत नाही.आप्पांच्या जीवनावर बोलायचं ठरलं तर कादंबरी सुद्धा कमी पडेल.स्वतः आनंदी रहायला शिका तरच दुसऱ्यांना आनंद देऊ शकाल अस ते नेहमी सर्वांना सांगतात.ज्ञान व धन हे देण्याकरताच असत ते सतत दिले पाहिजेअस त्याचं प्रांजळ मत आहे.आप्पांच हे निर्मळ देवस्वरूप पहायला आणि त्यांच गाण लोकांना ऐकायला मिळाव म्हणून सर्व शिष्यांनी एकत्र येवून “गुरुवंदना”या कार्यक्रमाची निर्मिती केली.व त्या माध्यामतून अनेक  नवनवीन कलाकारांना व्यासपीठ मिळाले व आप्पांचे गायन रसिकांना ऐकायला मिळावे म्हणून या कार्यक्रमाद्वारे सर्व नाशिककर रसिकांचे मनोरंजन व समाजसेवेचे कार्य गेली ३० वर्षापासून अविरतपणे चालू आहे,आणि चालूच राहील “गुरुवंदना” कार्यक्रमाचा हा यज्ञकुंड वर्षानुवर्ष असाच अहोरात्र पेटता राहील अशी ग्वाही देवून शेवटी अस म्हणावस वाटत कि,
कैसे मानू तव उपकार गुरुराया |
तुझ्या देयला अंत ना पार |

धन्यवाद!!!
:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
मु.पो-खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक४२२३०५
भ्रमणध्वनी-७०३०६९४९०७



No comments:

Post a Comment