मी पणातून बाहेर पडल्याशिवाय तुम्ही इतरांशी जोडले जावू शकत
नाही
त्यामुळे अहंकार टाळा. ‘मी’ ‘माझं’ ‘मला’ करणं टाळा.
२).सकारात्मक संवाद साधा, संपर्क ठेवा.
संवादाचा अभाव हे गैरसमजाचे मुख्य कारण आहे
त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संवाद चालू ठेवा
३).व्यवस्थित ऐका,समजून घ्या
शब्द फसवे असतात त्यामुळे शब्दांपेक्षा समोरची व्यक्ती
कोणत्या
परिस्थितीत बोलतेय
आणि तिला काय बोलायचय ते समजून घ्या.
४).शब्द जपून वापरा
चांगले शब्द हे जसे सुखकारक तसेच कठोर शब्द हे काळजाला
खोलवर घाव देणारे असतात त्यामुळे शब्द जरा जपून वापरा
५).अपेक्षा सोडा
इतरांकडून अपेक्षा हे सर्व दु:खांचे मूळ आहे,नात्यांमध्ये
अपेक्षा ठेवू नका
आणि अपेक्षे पोटी नाते हि जोडू नका.आपल्या परीने निस्वार्थी
योगदान करा.
६).माफी मागा
नातं अत्यंत जीवाचं असेल तर चूक असो वा नसो माफी मागा.
७).कौतुक करा
कौतुक सर्वांनाच आवडत.त्यामुळे संधी मिळेल तिथे कौतुक करा.
छोट-छोट्या चांगल्या गोष्टींसाठी समोरच्या व्यक्तीचं कौतुक करा.
८).माफ करा.
नातं मैत्रीचं असो वा प्रेमाचंत्या नात्यापेक्षा चूक हि
महत्वाची नसते.
त्यामुळे घडलेल्या घटनेपेक्षा व्यक्तीला महत्व द्या आणि
त्यांना क्षमा करा.
९).नकारात्मक संवाद टाळा.
उपहासात्मक बोलणं,कमी लेखण,टीका करणं,तुलना करणं,राग-राग
करणं,
पाठीमागे बोलणं
टाळा यामुळे नाती जास्त दुरावतात
१०).दिलेला शब्द पाळा.
जे तुमच्याकडून होणार नाही ते वचन देवू नका.आणि एकदा शब्द
दिला तर
तो कोणत्याही
परिस्थितीत पाळा त्याने विश्वास बळावतो.
:-अभिजीत राजेंद्र साबळे
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक
४२२३०५
abhisabale09@gmail.com
Nice👌👌
ReplyDeleteखूपच छान !
ReplyDelete