(अभिजीत रा.साबळे)(abhisabale09@gmail.com)
जेव्हा जेव्हा आपण शिक्षण
या विषयाशी निगडीत असलेल्या गोष्टींचा विचार करायला लागतो,तेव्हा अनेक संकल्पना मनात घोळत राहतात बऱ्याचशा संकल्पना माहित होतात आणि
तितक्याच नव्यानं जन्म घेतात.आज आपण ज्या ‘शिक्षण’ या संकल्पनेची चर्चा करतो त्याविषयी विचार करतो ते नेमकं काय आहे? एखाद्या विषयाबद्दल शास्त्रशुद्ध तर्कज्ञान आत्मसात करणं यालाच शिक्षण म्हणायचं
आणि असं शिक्षण कि ज्याद्वारे ती शिक्षित व्यक्ती आपलं जीवन विकसित करून समस्त
विश्वात त्याचा वापर करून वैयक्तिक अथवा सार्वजनिक पणे स्वतःच आयुष्य जगतो.मग
काय....मानवाचा जन्म झाला आणि शिक्षणाचं गाठोडे त्याला दिले.आणि म्हटले कि आता या
गाठोड्यातून तू शिकत रहा आणि शिक्षण पूर्ण करा,मोठ व्हा,नाव कमवा,पैसा कमवा? असं
नाही.ईश्वरानं मानवाची निर्मिती केली ती जन्मापासूनच एका ठराविक काळापर्यंत वाढ
होण्यासाठी,त्याची बुद्धी,कार्यक्षमता,आकलन,ग्रहणशक्ती काळानुरूप वाढत राहते आणि एका
ठराविक ठिकाणी स्थिर होते.
शिक्षण
क्षेत्रात ज्या घडामोडी आवश्यक आहे त्या काळानुरूप घडत गेल्या आणि एक विस्तृत
क्षेत्र म्हणून उदय झाला आहे.गुणवत्ता मिळवण्याची चढाओढ सुरु झाली,लोकसंख्या वाढत गेली सुविधांचा अभाव वाढत
गेला आणि त्यातूनच एक स्पर्धा उदयास आली.शिक्षण मिळवण्यासाठी स्पर्धा आणि अशा
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनाच समाविष्ट करून घेणे दुरापस्त झाले आणि मग एकच
संकल्पना सर्व संमतीने किंबहुना पारंपारिक पद्धतीला नवीन नाव देण्यात आहे ते
म्हणजे ‘आरक्षण’
शिक्षण
घेण्यापासून तर ते इतरांना देण्यापर्यंत हि प्रक्रिया टाळता येत नाही.सर्व समावेशक
तत्वांचा वापर करून गुणवत्ता मूल्यमापन पद्धती अंमलात आली तरच कदाचित शक्य आहे.पण
पुन्हा हा विषय एक वेगळे वळण घेतो त्याचा अर्थही वेगळा निघू शकतो त्याला शैक्षणिक
भाषेत चिथावणी देणे म्हटले जाऊ शकते.असो पण आपण आता फक्त ‘शिक्षणातील आरक्षण’याच
संकल्पनेविषयी मत मांडण्याचा छोटासा प्रयत्न करू माणसाच्या विचार शक्तीला विस्तृत
करण्याच काम शिक्षण करते यात काही एक शंकाच नाही.शैक्षणिक आयुष्याची सुरुवात होते
अगदी लहानपणी जसजसे त्याच वय वृद्धिंगत होते तसे त्याची बुद्धी तेज होते.आकलन
शक्ती वाढत जाते,स्नातक (विद्यार्थी) स्वतःच्या विकासाविषयी
एक स्वतंत्र मतप्रवाह बनवू शकतो अथवा इतर संबंधित त्याला तशा प्रकारचं प्रोत्साहन
देतात त्याला मदत करतात.
आता
पुन्हा आरक्षण-शिक्षण-भारतीय शिक्षण पद्धती मध्ये मानवाच्या बालपणापासूनच शिक्षण
संस्कार करतांना पूर्वप्राथमिक-प्राथमिक आणि माध्यमिक,उच्च माध्यमिक,महाविद्यालयीन,विद्यापीठीय अशा पायऱ्या तयार झाल्या,पात्रता/अर्हतानुसार
शिक्षणाचा क्रम ठरविला गेला पण त्यात केवळ कोणाएका ठराविक वर्गाला लाभ मिळावा असा
निकष नसला तरी जाती संरचनेवर गुणकांची घुसखोरी केवळ प्रवेशासाठी वापरला जातो हे
दुर्दैव आहे.विद्यार्थी कुठल्या क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छितो त्याच्या अंगी
वावरणाऱ्या सुप्त गुणांना चालना मिळून त्याच्या उगवत्या भविष्याला त्याची मदत
होईल.अशी शिक्षण प्रणाली जर विनासायास उपलब्ध झाली तर तो अधिक जोमाने कार्य करू
शकेन आणि त्यामुळे त्याच्या बौद्धिक विकासाबरोबरच आर्थिक व सामाजिक विकास
होण्यासाठी चालना मिळेल.पण हेच सर्व मिळवण्यासाठी जे निकष वापरले जातात.त्यापासून
दुरापस्त होणे फार गरजेचे आहे.मला वाटते कि विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता,आकलनशक्ती आणि विषयाबद्दलची रुची या निकषावर शिक्षण क्षेत्रात
प्रवेशप्रक्रिया राबवली तर विद्यार्थ्याची वैचारिक पातळीवरील मतभेद,जातीभेद आणि अर्थभेद दूर होऊन एक समान शिक्षणाची संधी उपलब्ध होणे क्रम
प्राप्त आहे.
शिक्षणातील
आरक्षण हा विषय अगदीच सोपा नाही.ज्यावेळी हि शिक्षणपद्धती अस्तित्वात आली
त्यावेळच्या उपलब्ध साधनांमुळे अथवा परिस्थितीमुळे विविध स्तरावर आरक्षण रास्तच
असावी पण आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सर्वांना समान संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत
केवळ आर्थिक निकषावर लक्ष देवून उपयोग होईल अस वाटत नाही.देशाचा विकास हा विकसित
नागरिकांवर अवलंबून आहे आणि सहजपणे रुचीनुसार माफक शिक्षण उपलब्ध झाले तर आज
समाजातील विविध प्रकारचे भेद नाहीसे होतील विद्यार्थी वर्ग केवळ आरक्षणातून आपल्या
रुचीनुसार शिक्षणाला वंचित होणार असेल तर कोणत्यातरी एका दोघांक्षेत्रामध्ये
निष्णांत जाणकारांची उणीव भासेल एखाद्याला उच्च तंत्रज्ञानात करिअर करावसं वाटत
असेल आणि त्याला त्या विषयामध्ये केवळ टक्केवारी आरक्षण यामुळे वंचित राहावे लागत
असेल तर तो विद्यार्थी स्वतःच्या आर्थिक बळावर मिळवण्यासाठी वेगळ्या मार्गाचा
अवलंब करीन अथवा तो तसा शिक्षण घेण्याचा विचार तरी सोडून देईल दोन्ही प्रकारात
मात्र नुकसान समाजाचेच परिणामी देशाचेच असणार आहे.
सदरच्या
विषयात सरळपणे टीका होतील असे बरेच मुद्दे आपण मांडू शकतो पण ज्या प्रकारचे
सामाजिक परिवर्तन देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे त्याच्या उच्च पातळीवर विचार
करून मागण्या अगोदर उपलब्ध करून देण्याचा भूमिकेत या क्षेत्राच्या विकासाला चालना देणे उचित ठरेल,समाज आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने रुचीनुसार,आवश्यकतेनुसार
उच्च प्रतीचे ज्ञान माफक,मुबलक स्वरुपात मिळाल्यास एक उन्नत
समाज व परिणामी देश निर्माण होऊ शकेन.
म्हणूनच
शिक्षणातील आरक्षणाला अलविदा....!!
(अभिजीत रा.साबळे)
(abhisabale09@gmail.com)
मु.पो.खेडलेझुंगे
ता.निफाड जि.नाशिक
४२२३०५
महाराष्ट्र
Nice blog 👌👍
ReplyDeleteसुंदर लिहिले
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteMast abhi...
ReplyDelete